खेळ

ब्रेकिंग! टीम इंडियाचा मोठा विजय, इंग्लंडला दणका

  • भारताने इंग्लंडवर एजबस्टन येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी झाली आहे. पहिल्या कसोटीतील पराभवाची परतफेड भारताने दुसरी कसोटी जिंकत केली आहे. 
  • भारताने शेवटच्या दिवशी इंग्लंड समोर विजयासाठी 608 धावांचे लक्ष ठेवले होते. चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद करत सामन्यावर पकड मिळवली होती. पाचव्या दिवसाची सुरूवात झाल्यानंतर आकाश दीपने इंग्लंडला बॅक टू बॅक दोन दणके दिले. त्यामुळे भारताची सामन्यावर आणखी घट्ट पकड मिळवली. शेवटी भारताने इंग्लंडवर 336 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाच कसोटी मालिकांच्या सिरीजमध्ये एक एक बरोबरही भारताने केली. 
  • ओली पोप आणि हॅरी ब्रुक यांना आकाश दीपने बाद केले. त्यानंतर मात्र कर्णधार बेन स्टोक आणि जीमी स्मिथ यांनी चिवट फलंदाजी केली. मात्र लंचच्या आधी बेन स्टोकला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. त्यामुळे इंग्लंडचा पाय आणखी खोलात गेला. मात्र जीमी स्मिथ याने एक बाजू लावून धरली होती. त्यानंतर आलेला ख्रिस वोक्स याने ही प्रतिकार केला. पण त्याला प्रसिद्ध कृष्णाने आऊट केले. त्याचा झेल मोहम्मद सिराजने घेतला. भारत आणि विजयाच्या मध्ये उभा असलेल्या स्मिथचा काटा आकाश दीपने काढला. त्याने 88 धावा केल्या. ही आकाश दीपची पाचवी विकेट होती. 
  • स्मिथला आऊट केल्यानंतर भारताने या सामन्यावर अजूनच पकड घट्ट केली. आकाश दिपने जोरदार बॉलिंगचे प्रदर्शन करत सहा विकेट घेतल्या. भारताच्या विजयात आकाश दीपचा वाटा मोठा आहे. इंग्लंडचा डाव 271 धावांवर कोसळला.

Related Articles

Back to top button