देश - विदेश

ब्रेकिंग! डोळ्यात पाणी, थरथर कापणारे हात

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडताना दिसत आहे. हाताला फ्रॅक्चर असूनही मिथुन चक्रवर्ती स्वत: पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते आणि यावेळी ते स्वत:ला भावूक होण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांचा पुरस्कार घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते आधार घेऊन खुर्चीवरून उठले आणि तत्कालीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा व्यासपीठावर सत्कार केला. मिथुन चक्रवर्ती यांच्या डोळ्यात आनंदाश्रू स्पष्ट दिसत होते. हा पुरस्कार स्वीकारताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, कदाचित मला आयुष्यात जितका त्रास झाला आहे त्याची देवाने परतफेड केली आहे.

Related Articles

Back to top button