सोलापूर
बिग ब्रेकिंग! सोलापुरात खून
सोलापूर (प्रतिनिधी) दारू पिण्याकरिता पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने-पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार मारून खून केल्याप्रकरणी पतीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजश्री तुळजाराम गुजराती (वय-२७,रा.अविनाश नगर, सुशील नगर जवळ,एमआयडीसी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी राजश्री यांचा भाऊ खाजा भिमराव विटकर (वय-३४, रा.साईबाबा चौक) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादी वरून फिर्यादीचे भावजी तुळजाराम मनोहर गुजराती (वय-३३, रा.अविनाश नगर, सुशील नगर जवळ, एमआयडीसी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.असे फिर्यादीत नमुद आहे. ही घटना ७ ऑक्टोंबर रोजी रात्री सव्वा दहा ते साडेदहाच्या दरम्यान अविनाश नगर, सुशील नगर जवळ डॉ.सदाफुले यांच्या दवाखाना शेजारी एमआयडीसी येथे घडली. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिवे हे करीत आहे.