राजकीय

वडील अन् काकांची दहशतवाद्यांकडून हत्या

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार शगुन परिहार विजयी झाल्या आहेत. त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या साजिद अहमद किचलू यांचा पराभव केला. शगुनने काही काळापूर्वीपर्यंत निवडणूक लढवण्याचा निर्णयही घेतला नव्हता, ती जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाची तयारी करत सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होती. 

पण ऐनवेळी भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. तसे पाहिले तर शगुन यांचे कुटुंब दीर्घकाळापासून भाजपशी संबंधित आहे. यापूर्वी त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी २६ ऑगस्ट रोजी भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. विशेषत: २०१८ मध्ये त्यांचे वडील अजित परिहार आणि काका अनिल परिहार यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती, तेव्हा हा निर्णय त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा होता. या दुर्दैवी घटनेमुळे किश्तवाडमध्ये तणाव निर्माण झाला आणि संचारबंदी लागू करावी लागली होती.

निवडणूक प्रचारादरम्यान शगुन म्हणाल्या की, मला दिलेले प्रत्येक मत केवळ आपल्या कुटुंबासाठी नाही तर दहशतवादामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबांसाठी आहे. 
आता त्यांच्या विजयानंतर शगुन यांची उमेदवारी भाजपसाठी राजकीयदृष्ट्या योग्य ठरल्याचे दिसून येत आहे. शगुनने एमटेकची पदवी घेतली असून सध्या ती डॉक्टरेट करत आहे. याशिवाय ती जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची ही तयारी करत आहे.

Related Articles

Back to top button