राजकीय

तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची सुप्रिया सुळेंकडून पाहणी

पुण्याजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती, त्याबाबत एकच संतापाची लाट उळल्याचे दिसून आले. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच या घटनास्थळाला काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाट परिसरात झालेल्या घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी पुण्यासह राज्यात घडत असलेल्या घटनांबाबत संताप व्यक्त केला आहे. यानंतर आता अजितदादा गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी, संबंधित घटना घडून पाच दिवस झाले. पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला खूपच दिवस गेले, असे म्हणत सुळेंवर टीकेचा बाण सोडला.
बोपदेव घाटात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाला घडून पाच दिवस उलटून गेले. पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले. मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून 12 टीम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी?

आपल्या माहितीसाठी, चंद्रपुरमध्ये कोरपना येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे. याविरोधात आंदोलन कधी करणार? आपल्या सोशल मिडियाच्या प्रदेश सरचिटणीसवर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे-पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत. पोलीस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता. नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी करणार? असे म्हणत चाकणकरांनी सुळेंवर घणाघात केला.

Related Articles

Back to top button