बिजनेस

खुशखबर! सोन्याचे दर गडगडले

सोन्याच्या दरात सुरू असलेल्या वाढीला आता ब्रेक लागल्याचे दिसत आहे. कारण आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे आणि दसरासुद्धा जवळ आला आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे नागरिकांना स्वस्तात सोने खरेदीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Goodreturns वेबसाईटनुसार आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 

24 कॅरेट सोन्याच्या दरात 7,600 रुपये प्रति शंभर ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे शंभर ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,74,500 रुपयांवरुन 7,66,900 रुपये इतका झाला आहे. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 760 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 77,450 रुपयांवरुन 76,690 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे.

Related Articles

Back to top button