महाराष्ट्र

निकाल हरियाणात, भूकंप महाराष्ट्रात?

  • लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसचा विश्वास दुणावला होता. हरियाणा विधानसभा निवडणुकीत अनुकूल वातावरण असताना काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. तसेच राज्यात देखील जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदारून आता काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भाजपप्रमाणे ठाकरे गटानेदेखील काँग्रेसच्या परभवाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. संजय राऊत यांनी काँग्रेसवर त्यांच्या खास शैलीत कानपिचक्या दिल्या आहेत. जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडून शिकायला हवे, अशी खोचक टीका त्यांनी ‘सामना’तून केली आहे.
    आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. हरियाणा व जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक असून हरियाणात फाजील आत्मविश्वास व स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा पराभव झाला आहे. हरियाणात भाजप सत्तेत येईल, हे कुणीच ठामपणे सांगत नव्हते. काँग्रेसचा या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवेल असे चित्र असतांना जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागणार आहे. भाजपविरोधी लाट असतांना भाजपचा परभव झाला नाही. याचे कारण काँग्रेसचे चुकीचे संघटन. 

Related Articles

Back to top button