क्राईम

बिग ब्रेकिंग! बीडमध्ये नवीन सिंघम

  1. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेत तर विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणी आवाज उठवला. 
  2. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यानंतर या घोषणेला 24 तास उलटत नाही तोच बीडला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत. नवनीत कांवत असे नवीन पोलीस अधीक्षकाचे नाव आहे.
  3. कांवत यांनी यापूर्वी संभाजीनगरचे पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. संभाजीनगरपासून बीड हे अगदी जवळचे ठिकाण आहे. तसेच मागच्या काही काळात देशमुख हत्या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर देखील कांवत यांचे लक्ष होते. 
  4. नवनीत 2017 बॅचचे IPS आहेत. ते मूळचे राजस्थानचे आहेत. नवनीत कांवत यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत. त्याचे सहावीपर्यंतचे शिक्षण मुरादाबादमध्ये झाले असून सहावी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगढ येथे झाले आहे. नवनीत हे शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते. वडिलांनी त्यांना एक आव्हान दिले आणि नवनीत यांनी दहावी, 11वी आणि 12 वी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. स्वत: वर विश्वास ठेवून दहावीमध्ये टॉप केले, तेव्हापासून स्वत:वरचा विश्वास वाढला. बारावीनंतर नवनीत यांनी आयआयटीमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी बी टेक केले.
  5. आई शिक्षिका, तर वडील रेल्वेत कार्यरत होते, त्यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले, मात्र नवनीत यांचा ओढा खासगी क्षेत्रात होता. नवनीत यांनी IIT मधून पदवी मिळवल्यानंतर, त्यांनी सॉफ्टवेअर डिजाईन इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरी केली. यादरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले. तिथे त्यांनी अभ्यास करुन ते 2017 मध्ये IPS बनले. त्यांची नियुक्ती आता बीडमध्ये करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button