महायुतीत राजकीय भूकंप?

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सोडून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर मला काही फार बोलायचे नाही. त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. परंतु, पाटील यांनी भाजपमध्ये राहायला हवे होते, अशी भावना पंकजा यांनी व्यक्त केली.
यावेळी पंकजा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल मोठ विधान केले आहे. त्या म्हणाल्या, जेव्हा आमचे जागावाटप होईल त्यावेळेस मी तुम्हाला ऑफिशयल आकडा सांगेन. अजित पवारांना सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर ते बाहेर पडतील, असे माझ्या ऐकण्यात नाही. हे फक्त मीडिया बोलले जात आहे. त्यामुळे ही चर्चा आता सर्वत्र पोहचली आहे, असे एकंदरीत वातावरण आहे, असे म्हणायला हरकत नाही.