क्राईम
मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू!

- बीडमध्ये रोज गुन्हेगारीच्या नव्या घटना समोर येत आहेत. आष्टी तालुक्यात एका 25 वर्षाच्या तरूणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजीच आहे. अशातच पुन्हा एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये घडली आहे. ट्रकमालकाने चालकाला डांबून ठेवले. अतिशय क्रूरपणे मारहाण केली. या मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाला.
- पिंपरी घुमरी येथे ट्रकमालकाने ट्रकचालकाला दोन दिवस डांबून ठेवले. या काळात चालकाला सतत मारहाण केली. शेवटी या मारहाणीत तरूणाने शेवटचा श्वास घेतला. त्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
- जालन्याचा विकास बनसोडे हा पिंपरी घुमरीतील क्षीरसागर यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करायचा. गेल्या चार वर्षांपासून तो क्षीरसागर यांच्याकडे काम करीत होता. परंतु त्याचे क्षीरसागर यांच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी विकास आणि क्षीरसागर यांची मुलगी घराच्या मागील बाजूस असलेल्या शेतात होते. त्यांना एकत्र पाहून क्षीरसागर संतापले अन् त्यांनी विकासला डांबून ठेवत जबर मारहाण केली.
- विकास आणि क्षीरसागर यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादानंतर क्षीरसागर यांनी विकासला डांबून ठेवत मारहाण केली, असा आरोप विकासचा भाऊ आकाशने केला.
- हा प्रकार समोर आल्यानंतर भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासच्या घरी फोन करत त्यांना तातडीने बीडला येण्यास सांगितले. विकासची आई मारहाण करू नका, अशी विनंती करत होती. परंतु बनसोडे कुटुंब जेव्हा बीडला पोहोचले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. विकासचा मृतदेह रूग्णालयातच असल्याची माहिती मिळत आहे.