क्राईम

ब्रेकिंग! शिंदे गटाच्या मंत्र्याचा भीषण अपघात

शिंदे गटाचे नेते तथा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कारचा काल अपघात झाला. पोहरादेवीतून यवतमाळला जात असताना त्यांच्या कारला मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान अपघात झाला. राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला. यामध्ये सुदैवाने राठोड बचावले आहेत. मात्र, पिकअपचा ड्रायव्हर जखमी झाला आहे.
मंत्री राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोहरादेवीला नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. येथून परतत असताना राठोड यांच्या गाडीचा अपघात झाला.

राठोड हे पोहरादेवी येथून रात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान निघाले होते. ते पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात होते. मात्र आर्णी येथील कोपरा गावाजवळ राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली. या अपघातमध्ये राठोड हे थोडक्यात बचावले. अपघातात राठोड यांच्या गाडीचे बरेच नुकसान झाले आहे. तर पिकअप वाहन पलटी झाले. ज्यामुळे पिअकपचा चालक जखमी झाला. 

Related Articles

Back to top button