हवामान

ब्रेकिंग! राज्यात पावसाचे कमबॅक!

सोलापूर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान मान्सूनने परतीचा प्रवास वेगाने सुरू केला आहे. सध्या ऑक्टोबर महिन्यात दुपारच्या वेळी कडाक्याचे ऊन जाणवत आहे. तर सायंकाळच्या वेळी तापमानात घट होत आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज घटस्थापनेच्या दिवशीही अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच नगर, पुणे, सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

Related Articles

Back to top button