ब्रेकिंग! बांगलादेशचा सुफडासाफ…
टीम इंडियाने कानपूर कसोटी सामना सात गडी राखून जिंकला आहे. अखेरच्या दिवशी आज बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य दिले होते. जे टीम इंडियाने अवघ्या ३ गडी गमावून १७.३ षटकात पूर्ण केले. अशा प्रकारे टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने धुव्वा उडवला.
९५ धावांचा पाठलाग करताना भारताकडून यशस्वी जैस्वालने अर्धशतक केले. तो अर्धशतकानंतर ५१ धावा करून बाद झाला. विराट कोहली नाबाद परतला.
पाचव्या दिवशी बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या १४६ धावांवर गारद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारताकडून बुमराह, अश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामना २८० धावांनी जिंकला होता. रविचंद्रन अश्विनने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली होती.
तत्पूर्वी, कानपूर कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य होते. मात्र रोहित शर्माच्या (८) धावांच्या रूपाने भारतीय संघाला पहिला धक्का मेहदी हसन मिराजने दिला. यानंतर आलेल्या शुभमन गिलने (६) येताच चौकार ठोकला, पण तो पुन्हा मेहदीच्या फिरकीत अडकला आणि एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर यशस्वीने बाद होण्यापूर्वी ५१ धावा केल्या.