बिजनेस
सोन्याचे भाव घसरले

अलीकडे सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढत आहेत. मात्र आज ऑक्टोबर महिन्याच्या पहिला दिवशी सोन्याच्या किंमतीत थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत. तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे नवीन दर जाणून घ्या.
देशभरात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,050 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,691 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज देशभरात चांदीची किंमत 95,000 प्रति किलोग्राम आहे.
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी सविस्तर माहिती दिली जाईल.



