राजकीय

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. दरम्यान आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने निर्णयांचा धडाका सुरूच ठेवत कोतवाल व होम गार्डच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र या बैठकीनंतर वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली आहे. त्याचबरोबर वळसे -पाटील पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून वळसे -पाटील आज पुण्यात पवारांची भेट घेणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर वळसे -पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पवारांनी आपल्याला सोडून गेलेल्या आमदारांना घेरण्यास सुरूवात केली असून त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे करत अनेकांची मतदारसंघातच कोंडी केली आहे. त्यातच  वळसे -पाटील यांनी तुतारी हाती घेत पवारांकडे परत जाण्याचा निर्णय घेतल्यास अजितदादा पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

Related Articles

Back to top button