ब्रेकिंग! कसोटी क्रिकेटमध्ये टी 20 चा थरार
भारतीय कर्णधार रोहित शर्माने भलेही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल. पण त्याने चाहत्यांना त्याची जाणीव होऊ दिली नाही. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये चक्क टी 20 प्रमाणे इनिंग खेळून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रोहित हा आपल्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकणारा जगातील पहिला सलामीवीर ठरला आहे. कानपूरमध्ये बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज त्याने दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला सलग दोन षटकार ठोकले. या सामन्यात त्याने छोटी पण आक्रमक खेळी खेळली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
कसोटी डावातील पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकणाऱ्या जगातील मोजक्या खेळाडूंमध्ये रोहितचा समावेश झाला आहे. असे करणारा तो पहिला सलामीवीर आहे. तर इतर तीन क्रिकेटपटू मधल्या फळीत किंवा खालच्या फळीत खेळले आहेत. यामध्ये फोफी विल्यम्सचे नाव आहे. तर सचिन तेंडुलकरचाही या यादीत समावेश आहे.
उमेश यादवनेही हा पराक्रम केला आहे. विल्यम्सने हा पराक्रम 1948 मध्ये जिम लेकरविरुद्ध केला होता, तर सचिनने 2013 मध्ये नॅथन लायनविरुद्ध दोन षटकार ठोकले होते. यादवने 2019 मध्ये जॉर्ज लिंडेविरुद्ध दोन षटकार मारले होते.
हिटमॅन रोहित स्फोटक शैलीत फलंदाजी करताना दिसला. त्याने 11 चेंडूत 23 धावांची खेळी खेळली. ज्यात 1 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट 209.09 होता. जरी त्याची खेळी लहान होती. तरीही ती संघाला वेगवान सुरुवात करण्यात उपयुक्त ठरली.