क्राईम
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील थरकाप उडवणारे 15 नवे व्हिडीओ समोर

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण करून हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे व महेश केदार यांनी दिली आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हत्या कशा पद्धतीने केली याची देखील माहिती दिली आहे. अशातच आता देशमुख हत्याप्रकरणी अंगाचा थरकाप उडवणारी माहिती समोर आली आहे.
- आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते. हे सर्व 15 व्हिडिओ आणि 8 फोटो दोषारोपपत्रात जोडण्यात आले होते. हा सर्व डेटा पोलिसांच्या हाती लागला असून तो न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे.
- देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेशने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते. 3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणला सुरुवात झाल्याचा पहिला व्हिडीओ आहे.
- तर शेवटचा व्हिडिओ 5 वाजून 53 मिनिटांचा आहे. ज्यामध्ये देशमुख यांचा व्हिवळताना एकदम लहान आवाज येत आहे. तब्बल दोन तास सात मिनिटे आरोपी हे देशमुख यांना मारत होते आणि व्हिडीओही काढत होते. हे सर्व व्हिडीओ नऊ डिसेंबर रोजीचे आहेत.