देश - विदेश

मोठी बातमी! भारत हल्ला करणारच; पाक सरकारची पळापळ

  • पहलगाम हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव आता चांगलाच वाढला आहे. पाकिस्तानसोबतचे रोज कोणते ना कोणते कठोर निर्णय भारत घेत आहे. त्यातच पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानी जनतेला अलर्ट केले.
  • चौधरी अन्वर उल हक यांनीही नियंत्रण रेषेजवळील १३ मतदारसंघातील नागरिकांना दोन महिन्यांचे राशन भरुन ठेवण्याचे आवाहन केले.
  • विधानसभेत चौधरी अन्वर उल हक यांनी पाकिस्तानी जनतेला संबोधित केले. त्यात भारत पाकिस्तानवर नक्की हल्ला करेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. हक म्हणाले की, नियंत्रण रेषेजवळील १३ मतदारसंघामध्ये दोन महिन्यांसाठी अन्न पुरवठा साठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न, औषधे आणि सर्व मुलभूत गरजांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने एक अब्ज रुपयांचा आपत्कालिन निधी तयार केला आहे.
  • नियंत्रण रेषेवरील भागातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी सरकार आणि खासगी यंत्रणा तैनात केल्या आहेत. पाकव्याप्त काश्मिरमधील १०० हून अधिक मदरसे किमान १० दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत. शाहबाज सरकारला भीती आहे की भारत पीओके (व्याप्त काश्मीर) मध्ये भारत लष्करी कारवाई करू शकतो. भारत लवकरच आपल्यावर हल्ला करू शकतो याचे विश्वसनीय पुरावे पाकच्या नेत्यांनी बोलताना सांगितले.

Related Articles

Back to top button