देश - विदेश

ब्रेकिंग! पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा चेन्नईतून श्रीलंकेला पळण्याचा प्रयत्न?

  • पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान पहालगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत पळून गेल्याचे म्हटले जात आहे. 
  • कारण, श्रीलंका एअरलाइन्सची फ्लाईट कोलंबो एअरपोर्टवर लँड होताच सुरक्षा दलांनी विमानाला वेढा घातला. तसेच सुरक्षा दलांनी विमानाच्या आत जाऊन देखील सर्च ऑपरेशन राबवले.
  • चेन्नई एरिया कंट्रोलमधून कोलंबो एअरपोर्टला माहिती पुरवण्यात आली. यामध्ये पहलगाम हल्ल्यातील सहा दहशतवादी चेन्नईतून कोलंबोला चाललेल्या श्रीलंकन एअरलाइन्समध्ये असल्याचे इनपुट मिळाले. ही माहिती मिळताच कोलंबो एअरपोर्टवर श्रीलंकन सुरक्षा दलांनी विमानाला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन राबवले.
  • श्रीलंका प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात चेन्नई एरिया कंट्रोलकडून अलर्ट मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर लगेच सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. अलर्टमध्ये पहालगाम हल्ल्यातील सहा दहशतवादी जात असल्याचा संशय होता. त्यानंतर विमानाची कडक तपासणी करण्यात आली. त्यानंतर फ्लाईटला क्लिअरन्स देण्यात आला.

Related Articles

Back to top button