देश - विदेश
मोठी बातमी! पाकिस्तानचा फुसका बार

- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जशी ताकद दाखवायला सुरुवात केली, तशीच पाकिस्ताननेही केली. आज पाकिस्तानने अब्दाली मिसाईलची प्रशिक्षण चाचणी घेतली. या मिसाईलची पाकिस्तानने जगभरात जोरदार चर्चा सुरु ठेवली होती. एक्सरसाईज इंडसमध्येही या मिसाईलला पाकिस्तानचे मोठे यश मानले गेले होते. त्यामुळे या प्रशिक्षण चाचणीकडे भारताच्याच नाही तर, संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या. परंतु ही चाचणी फुसका बार ठरली.
- अब्दाली हे बॅलेस्टिक मिसाइल असून त्याची रेंज 450 किलोमीटर आहे. पाकिस्तानच्या सोनमियानी रेंजमध्ये या मिसाईलची आज चाचणी करण्यात आली. आर्मी स्ट्रेटेजिक फोर्सेज कमांड अंतर्गत ही चाचणी करण्यात आली. ऑपरेशनल यूजर ट्रायलचा हा भाग होता. या चाचणी दरम्यान पाकिस्तानी सैन्याचे स्ट्रेटेजिक फोर्स कमांडचे कमांडर लेफ्टनेंट जनरल मुहम्मद शाहबाज खान आणि स्ट्रेटेजिक प्लांस डिवीजनचे डीजी मेजर जनरल शहरयार परवेज बट उपस्थित होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सतत मिसाइल चाचणीची धमकी देत होता. त्या अनुषंगाने ही चाचणी झाली.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चाचणीला विशेष महत्त्व मिळाले नाही. या चाचणीनंतर पाकिस्तानच्या लष्करी विश्वासार्हतेत वाढ होण्याऐवजी घट झाल्याचे सांगितले जाते. पाकिस्तान आजही कमी अंतराच्या जुन्या मिसाइल्सवर ताकद वाढल्याची दाखवत आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारताच्या मिसाइल यंत्रणेशी अब्दालीची तुलना केल्यास ते एकदम सामान्य असल्याचे दिसते.