देश - विदेश
ब्रेकिंग! पाकिस्तानच्या हातातून एक शहर निसटले?

- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. यातच आता पाकिस्तानला हादरवणारी बातमी आली आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एक मोठी घडामोड घडली आहे. कालात जिल्ह्यातील मंगोचर शहरातील अनेक इमारतींवर बलूच बंडखोरांनी कब्जा केला आहे. सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि रिपोर्ट्सनुसार बंडखोरांनी शहरातील सरकारी इमारती आणि सैन्य ठिकाणे स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत.
- मंगोचर शहरावर बलुच बंडखोरांनी ताबा घेतला असून, या चकमकीत पाकिस्तानच्या सैन्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने मंगोचरमधील पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवर थेट हल्ला केला. या हल्ल्यानंतर परिसरात भीषण गोळीबार आणि स्फोट झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये सरकारी इमारतींवर बंडखोरांचे नियंत्रण स्पष्टपणे दिसून येत आहे.



