- या वर्षीचा उन्हाळा सोलापूर शहरासाठी विशेष तापदायक ठरत असून तापमानाने सातत्याने उच्चांकी पातळी गाठली आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार शहरातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसारच ही तापमानवाढ अनुभवायला मिळत आहे, ज्यामुळे सोलापूरकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. वाढलेल्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर, तसेच पाणी आणि वीज वापरावर परिणाम होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- दरम्यान सोलापुरात एक मे रोजी 44.1 अंश तर काल 44.7 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली होती. तर आज 42.5 अंश इतके तापमान नोंदले गेले. परिणामी सोलापूरकरांना आज किंचित दिलासा मिळाला.
ब्रेकिंग! सोलापुरात आज तापमान किती?
