देश - विदेश
ब्रेकिंग! भारत-पाक तणावावर मोठी अपडेट

- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्ट्री चंदा आणि मध्य प्रदेशातील खमरिया ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली असून सीमेवर तणाव वाढला आहे. या परिस्थितीत सैन्याला दारुगोळा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या फॅक्टरीतील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावामुळे सैन्याला सतत दारुगोळा पुरवठा आवश्यक आहे. यासाठी ऑर्डिनन्स फॅक्टरींवर मोठी जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्ट्री चंदा आणि मध्य प्रदेशातील खमरिया ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्ये कर्मचाऱ्यांच्या अधिकच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी हा आदेश जारी करण्यात आला आणि सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर परतण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी दोन मे रोजी खमरिया ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्येही दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या.
- या फॅक्टरींमध्ये सध्या सैन्यासाठी आवश्यक असणाऱ्या दारुगोळाचे उत्पादन जोरात सुरू आहे. चंदा ऑर्डिनन्स फॅक्ट्री ही देशातील सर्वात मोठ्या आयुध निर्माण केंद्रांपैकी एक आहे. याठिकाणी बॉम्ब, मिसाइल्स आणि इतर शस्त्रांचे उत्पादन केले जाते. खमरिया ऑर्डिनन्स फॅक्ट्रीही सैन्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. या फॅक्टरींमध्ये सध्या 24 तास काम सुरू आहे आणि कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम काम करण्यास सांगण्यात आले आहे.



