देश - विदेश

ब्रेकिंग! भारत पाकिस्तान से ताकदवर था, है और इंशाअल्लाह हमेशा रहेगा!

पाकिस्तान भारताला कधीच शांततेत राहू देणार नाही. आपण यांना चोख उत्तर देण्याची आज वेळ आहे, असे म्हणत एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानची पुरती औकातच काढली. आधी आरशात तोंड पाहा, असे ते म्हणाले.

ओवेसींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी पाकिस्तानचे कान टोचले आणि मिसाईल टेस्ट आणि कुरापतीविरोधात जोरदार उत्तर दिले. लक्षात ठेवा जेव्हा भारताकडे कुणी बोट दाखवतो त्यावेळी आम्ही आमचे राजकारण आणि सर्व गोष्टी विसरुन भक्कम दरवाजासारखे शत्रूंविरोधात उभे राहतो. आम्ही या सर्व लोकांना सांगतो की, आज तुम्ही भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले आहे. मला विश्वास आहे की, ज्या निष्पापांचा बळी गेला त्यांचे रक्त व्यर्थ जाणार नाही.

मी सांगतो की, भारत सरकारने हा निर्णय घेतला की, पाकिस्तानची जहाज आणि पाकिस्तानची विमाने भारताच्या हद्दीत येणार नाहीत. आम्ही हेही सांगतो की, पाकिस्तानला काळ्या यादीत टाकायला हवे. जी लोक पाकिस्तानात बसून भारताविरोधात काय काय बोलत आहेत, त्यांनी त्यांचे तोंड आरशात बघणे गरजेचे आहे. पाकिस्तान एक फेल देश आहे, लक्षात ठेवा ही ताकद भारताला कधीच शांततेत राहू देणार नाही. आपण यांना चोख उत्तर देण्याची आज वेळ आहे. त्यामुळे नेहमीसाठी दहशतवादी विषवल्ली नाहीशी होईल, असे ओवेसी म्हणाले.

Related Articles

Back to top button