महाराष्ट्र

ब्रेकिंग! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

  • फेब्रुवारी-मार्चमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून बारावीचा निकाल कधी लागणार याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुरुवातीला बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल, असे सांगण्यात येत होते. त्यानंतर हा निकाल १५ तारखेचा आत लागेल, असं सांगण्यात येत होतं. मात्र आता थेट निकालाची तारीखच समोर आली आहे.
  • उद्या पाच मे रोजी बारावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. उद्या सकाळी बोर्डाकडून बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
  • कुठे पाहता येणार निकाल-
  • mahahsscboard.in
  • mahresult.nic.in
  • hscresult.mkcl.org
  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • sscboardpune.in
  • sscresult.mkcl.org
  • hsc.mahresults.org.in

Related Articles

Back to top button