देश - विदेश

कंगाल आणि भिकारी पाकिस्तान!

  • पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव प्रचंड वाढला आहे. भारत केव्हाही हल्ला करील, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य अलर्ट आहे. पण यातच आता पाकिस्तानी सैन्याला हादरविणारी बातमी आली आहे. पाकिस्तानच्या सैन्याला सध्या दारूगोळ्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. एनआयए वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानी सैन्याकडे फक्त 96 तास पुरेल इतकाच शस्त्रसाठा शिल्लक आहे. म्हणजेच एखादे मोठ्या युद्धाला तोंड फुटले तर पाकिस्तान फक्त काही तासच युद्धाच्या मैदानात तग धरू शकतो.
  • आता हे संकट निर्माण होण्यामागे कारणही आहे. पाकिस्तानने नुकताच मोठा शस्त्रसाठा युक्रेनला दिला आहे. 155mm आर्टिलरी शेल्स मोठ्या प्रमाणात पुरवठा केल्यामुळे पाकिस्तानचा साठा संपला आहे. पाकिस्तानच्या आर्टिलरी आधारित युद्ध नीतीसाठी हे साहित्य खूप महत्वाचे आहे. पैसे मिळवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने हा उद्योग केल्याचेही आता समोर आले आहे
  • पाकिस्तानातील हत्यारे निर्माण करणारी कंपनी पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरी आता जुनी उपकरणे आणि घरगुती मागणी सुद्धा पूर्ण करण्याच्या स्थितीत नाही. कंपनीने देखील हे मान्य केले आहे.
  • एनआयएच्या रिपोर्टनुसार अलीकडे कोअर कमांडर्सची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत हत्यारांच्या कमतरतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकारी काळजीत पडले आहेत. तसेच अस्वस्थही झाले आहेत. जर भारताविरुद्ध युद्ध सुरू झाले तर आपण किती दिवस टिकू, याची चिंता या अधिकाऱ्यांना सतावत आहे. या काळजीने त्यांची रात्रीची झोप उडाली आहे.

Related Articles

Back to top button