देश - विदेश

खड्डे न बुजविल्यास रस्तेच ताब्यात घेणार

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. पुढील तीन महिन्यात पुणे -मुंबई आणि पुणे -नगर या दोन्ही रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास केंद्र सरकार हे दोन्ही रस्ते आपल्या ताब्यात घेईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
गडकरी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण आणि वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते व पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी सरकारचे कान टोचले.

गडकरी म्हणाले, पुणे-मुंबई व पुणे-नगर या दोन रस्त्यांची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. मात्र, या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा मागणी करून देखील या मार्गावरील खड्डे बुजविले जात नाहीत. परिणामी मला शिव्या खाव्या लागतात. त्यामुळे पुढील तीन महिन्यात हे रस्ते दुरुस्त करावेत.

Related Articles

Back to top button