टीम इंडियाच्या विजयानंतर बीसीसीआयची मोठी घोषणा
चेन्नई कसोटीत धमाकेदार विजयानंतर बीसीसीआयने कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर लगेचच बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी निवड समितीने टीम इंडियाचा तोच संघ कायम ठेवला आहे. बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी संघात कोणताही बदल केलेला नाही. दुसऱ्या कसोटीसाठीही तोच १६ सदस्यांचा संघ आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (राखीव यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.