क्राईम

दोघांनी चौकात पाणीपुरी खात ठेवली पाळत

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेने खळबळ उडाली होती. आंदेकरांची हत्या ही पुर्वनियोजित कट असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, या प्रकरणात दोषी असणारे इतर आरोपी यांनी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणाबाबत आता नवे खुलासे समोर येत आहेत.
या घटनेआधी आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांनी नाना पेठ परिसराची पाहणी केली होती. दोघांनी पाणीपुरी खात वनराज यांच्यावर पाळत ठेवली असल्याची माहिती आता तपासात समोर आली आहे. वनराज यांच्या हत्या प्रकरणामध्ये विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांना अटक करण्यात आली आहे.

वनराज हे कार्यकर्त्यांबरोबर असल्याची माहिती आरोपींना होती. आरोपी तोरमकर आणि कदम यांनी चौकात एका ठिकाणी पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली. एक सप्टेंबर रोजी पाळत ठेवून असताना वनराज आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम हे डोके तालीम परिसरातील उदयकांत आंदेकर चौकात गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर कोणीही कार्यकर्ते नव्हते. याचा फायदा घेत तोरमकर आणि कदम यांनी संधी साधत सेव्हन लव्हज चौकात थांबलेल्या साथीदारांना याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात तिथे आलेल्या आरोपींनी वनराज यांच्यावर हल्ला केला.

Related Articles

Back to top button