खेळ

ब्रेकिंग! चेन्नई कसोटीत भारताचा शानदार विजय

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या या कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव केला.
हा सामना चौथ्या दिवशीच सामना संपला. ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २३४ धावांत सर्वबाद झाला आणि टीम इंडियाने मोठा विजय मिळवला. अश्विनने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाच्या विजयात अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने मोठे योगदान दिले. बॉल आणि बॅटने दमदार कामगिरी करून त्याने बांगलादेशला दुहेरी दणका दिला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने सर्वबाद ३७६ धावा केल्या. आर अश्विनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ११३ धावा केल्या. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी ४७.१ षटकांत १४९ धावांत गुंडाळले. 

Related Articles

Back to top button