महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना खुशखबर!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत.
आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत. अर्ज मंजूर झालेल्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले आहेत. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधीपर्यंत येणार? याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे पैसे याच महिन्याच्या (सप्टेंबर) अखेरपर्यंत देऊ, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये आयोजित बांधकाम कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही. महिलांना त्यांचा हक्क दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button