महाराष्ट्र

ब्रेकिंग! पुढच्या पंधरा दिवसांत राज्यात…

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. दरम्यान, पुढील पंधरा दिवसात राज्यात आचारसंहिता लागणार असून त्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यात जास्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले.

राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज सोलापूरमधील मोहोळमध्ये आहे. यावेळी अजितदादा यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी भर सभेत शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे.काही योजना या आउटडेटेड झाल्यात म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली. पूर्वी शेतकऱ्यांना लाईट बिलसाठी अनुदान मिळायचे. मात्र आता यापुढे वीज बिल द्यायचे नाही आणि मागचे बिल द्यायचे नाही. आमचे सरकार आणा, पुढील पाच वर्षे मोफत वीज मिळेल, असा शब्द अजितदादा यांनी यावेळी दिला.

Related Articles

Back to top button