महाराष्ट्र

विधानसभेत भाजपचा सुपडासाफ होणार

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. दरम्यान,  जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे गेल्या काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा मलिक यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

अशातच मलिक यांनी मुंबईच्या दौऱ्यावर असताना मातोश्री निवासस्थानी जात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या भेटीनंतर मलिकांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत भाजपाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ होणार असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीवर भाष्य करत म्हटले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा आणि भाजपचा सुपडासाफ होणार आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माझा महाविकास आघाडीला पाठिंबा असेल. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मी प्रचार सभांसाठी येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button