देश - विदेश

ब्रेकिंग! विश्वगुरु व्हायचे असेल तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा, गडकरींचे तुफान भाषण

लोकशाहीची खरी कसोटी हीच आहे की, सत्तेत असलेल्या व्यक्तीने आपल्या विरोधात असलेले जोरदार मतही सहन करावे आणि विरोध असेल तर आत्मपरीक्षण करावे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 
पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले की, जाती किंवा धर्माने प्रेरित सामाजिक विषमतेने देश पुढे जाऊ शकत नाही. गीता, कुराण आणि बायबलची मूळ कल्पना एकच आहे. देवाची प्रार्थना कशी करावी ही व्यक्तीची निवड आहे. आपल्याला जसे भाषण स्वातंत्र्य आहे तसेच आपल्याला धर्म स्वातंत्र्य आहे. 
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करून ते म्हणाले, शिवाजी महाराजांपेक्षा धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्त्वाचे दुसरे उदाहरण असू शकत नाही. इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे त्यांनी कधीच नष्ट केली नाहीत. विरोधी असणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला त्यांना घरी पाठवले. एका अर्थाने त्यांनी आदर्श राजाचा परिचय करून दिला. सर्वधर्मसमभावाचे जुन्या इतिहासातील सगळ्यात चांगले उदाहरण कुठले असेल छत्रपती शिवाजी महाराज आहे याचा मला विश्वास आहे. आपला देश ‘विश्वगुरु’बनायचा असेल तर सामाजिक समरसतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

Related Articles

Back to top button