क्राईम
ब्रेकिंग! देश पुन्हा हादरला ; बेंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती

दिल्लीतील श्रद्धा वालकर नावाच्या मुलीची हत्या करून तिचे 36 तुकडे करून तिला मेहरौलीच्या जंगलात फेकून दिल्याच्या भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
आता अशीच एक घटना बेंगळुरूमध्येही समोर आली आहे. ही घटना बेंगळुरूमधील मल्लेश्वरममधील वायलीकवल पोलीस स्टेशन परिसरात घडली. 29 वर्षांच्या तरुणीची क्रूरपणे हत्या करण्यात आली असून तिच्या शरीर 32 तुकड्यांमध्ये कापून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले.
सुमारे 15 दिवसांपूर्वी हा हत्येचा कट उघडकीस आला.
पोलिसांना गुन्हेगाराच्या घरात रेफ्रिजरेटरमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महालक्ष्मी असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेला चार वर्षांचा मुलगाही आहे. महिलेचा नवरा नेलमंगला येथे राहतो. तसेच मृत महिला ही वायलीकवळ येथे ती एकटीच राहत होती. मुलगा वडिलांसोबत राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.