सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! दुसरे लग्न करण्याची धमकी देऊन विवाहितेचा…

सोलापूर (प्रतिनिधी) विवाहिता ही सासरी नांदत असताना घरातील लहान कारणावरून शिवीगाळ करून माहेरी हाकलून देऊन दुसरे लग्न करण्याची धमकी दिली. तसेच माहेरून १५ लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत छळ केल्याची घटना दि.२२ नोव्हेंबर २०२० ते दि.८ मे २०२४ दरम्यान फिर्यादी यांच्या सासरी तरडगाव, ता.इंदापूर जिल्हा पुणे येथे घडली.
याप्रकरणी आरती तेजपाल सोनवणे (वय-२४,रा.मड्डी वस्ती) जुना तुळजापूर नाका यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून पती अक्षय सोनवणे,सासू रमा सोनवणे,दीर संग्राम सोनवणे,चुलत दीर राजू सोनवणे,चुलत नंणद शितल सोनवणे (सर्व.रा.तरडगाव,तालुका इंदापूर जिल्हा पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रुपनर हे करीत आहेत.