क्राईम

तो दरोडा नव्हताच..फक्त बनाव दरोड्याचा

राज्यात खून, दरोडे, बलात्कार या सारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. आज अशीच एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने मुलींसमोरच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघड झाले आहे. यानंतर घरात चोरी झाल्याचा बनाव रचत पत्नीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केला. 

आरोपी पत्नीला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुल निवंगुणे हे ड्राव्हवर आहे. ते एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. 
शुक्रवारी रात्री घरी सर्व जण झोपले होते. यावेळी रात्री एकच्या सुमारास काही लोकांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. यावेळी राहुल यांनी दरवाजा उघडला. तेव्हा काही जण चेहऱ्यावर बुरखा लावून त्यांच्या पुढे उभे असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी काही विचारायच्या आत हल्लेखोरांनी राहुल यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. 
राहुल यांचा आवाज ऐकून त्यांच्या मुली व पत्नी दरवाजाजवळ आल्या.
वडिलांवर झालेला हल्ला पाहून मुलींना धक्का बसला. यानंतर हल्लेखोरांनी दागिने व रोकड किंमती वस्तूंची चोरी केली, अशी माहिती पत्नीने पोलिसांना दिली. पोलिसांना काही माहिती देण्याच्या अवस्थेत मुली नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी राहुल यांच्या पत्नीची चौकशी केली. 
तेव्हा त्यांच्या जबाबात त्यांना तफावत आढळली. त्यांनी कसून चौकशी केली असता पत्नीनेच राहुल यांची हत्या केली असल्याचे पुढं आले. पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला देखील अटक केली आहे.
राहुल यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. या संबधाची माहिती राहुल यांना मिळाली होती. त्यामुळे ते पत्नीवर नजर ठेऊन होते. याची कुणकुण पत्नीला लागली. त्यामुळे तिने राहुल यांची हत्या करण्याचे ठरवले. तिने प्रियकराच्या मदतीने यापूर्वी देखील राहुल यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, तो फसला होता.

Related Articles

Back to top button