राजकीय
ब्रेकिंग! प्रकाश आंबेडकर यांचा धमाका

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार हे अद्याप जाहीर झाले नसताना व सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीतील पक्षांचे जागावाटप अद्याप पूर्ण झाले नसताना प्रकाश आंबेडकर यांनी धमाका केला आहे. आंबेडकर यांनी स्वत:च्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची थेट पहिली यादीच जाहीर केली आहे.
यात प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील मतदारसंघांचा समावेश असून विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यादी जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या नावांपुढे त्यांच्या समाजाचा उल्लेख केला आहे. एका तृतीयपंथीयालाही स्थान देण्यात आले आहे.
आंबेडकर यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ११ उमेदवार कोण? रावेर – शमिभा पाटील, सिंदखेड राजा – सविता मुंढे, वाशिम – मेघा किरण डोंगरे, धामणगाव रेल्वे – नीलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे, साकोली – डॉ. अविनाश न्हाणे, नांदेड दक्षिण – फारुख अहमद, लोहा – शिवा नारांगळे, औरंगाबाद पूर्व – विकास रावसाहेब दांडगे, शेवगाव – किसन चव्हाण, खानापूर – संग्राम कृष्णा माने.