खेळ
ब्रेकिंग! भारताचा दुसरा डाव घोषित, बांगलादेश समोर इतक्या धावांचे तगडे लक्ष्य

बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत शुभमन गिलने दमदार कामगिरी करत शतक झळकावले. टीम इंडियासाठी गिलचे हे पाचवे कसोटी शतक आहे. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात त्याला विशेष काही करता आले नाही. पण दुसऱ्या डावात त्याने दमदार कामगिरी केली. गिलच्या आधी ऋषभ पंतनेही शतक झळकावले आहे.
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने दमदार कामगिरी केली. गिलने ऋषभ पंतसोबत शतकी भागीदारीही केली. मात्र यानंतर पंत बाद झाला.
गिलने आतापर्यंत १२ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्याने कसोटीत ५ शतके झळकावली आहेत. भारताने तिसऱ्या दिवशी बांग्लादेशसमोर 515 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. भारताने दुसरा डाव 4 बाद 287 धावांवर घोषित केला.