राजकीय

ब्रेकिंग! काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये

  • राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. दरम्यान, काँग्रेसने थेट मुख्यमंत्रि‍पदावर दावा करू नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळेच काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला. काँग्रेसचे स्थानिक नेते निवडणुकीआधीच मुख्यमंत्रिपदावर दावा करू लागले आहेत. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. तरीदेखील काँग्रेस नेते अशी वक्तव्ये करत आहेत. काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असे स्पष्ट केले होते. या नेत्यांच्या वक्तव्यांवरच राऊत यांनी आज काँग्रेसला थेट शब्दांत इशारा दिला.
    महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसच्या सध्याच्या धोरणावर राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच काँग्रेसला सूचक शब्दांत इशाराही देऊन टाकला.
  • राऊत म्हणाले, आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढला आहे फक्त काँग्रेसचाच कशाला वाढला पाहिजे? आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढला आहे. तो लोकसभेचा आत्मविश्वास होता. विधानसभेच्या आत्मविश्वासासाठी आपल्याला परत एकदा काम करावे लागणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांना एकत्र यावे लागेल. आत्मविश्वास वाढला म्हणून ते काही एकटे लढणार नाहीत ना. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? 

Related Articles

Back to top button