राजकीय

राज्यात दिवाळीनंतरच विधानसभा निवडणुकांचे फटाके फुटणार

राज्यात विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार असून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शिंदे बोलत होते. महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत असून हरियाणासह निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, ऑगस्टमध्ये हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेच्या कारणास्तव निवडणूक कार्यक्रम नंतर जाहीर केला जाईल, असे जाहीर केले होते.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. दोन टप्प्यांत निवडणूक घेणे श्रेयस्कर ठरेल. गुणवत्ता आणि चांगला स्ट्राईक रेट हा महायुतीतील मित्रपक्षांमधील जागावाटपाचा निकष असेल, असे शिंदे यांनी सांगितले.
जागावाटपाबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजप, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या महायुतीतील घटक पक्ष येत्या आठ ते दहा दिवसांत जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button