बिजनेस

ब्रेकिंग! गॅस सिलेंडरच्या नियमात पुन्हा बदल

गॅस बुकिंग करण्यासाठी मोबाईलवर संबंधित क्रमांकावर कॉल केला जातो. त्यानंतर संबंधित एजन्सीकडून तुमच्या घरी गॅस सिलेंडर पोहच केले जाते. परंतु, यापुढे आता एलपीजी कंपनीद्वारे ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मोबाईलवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जर गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ओटीपी सांगितला नाही तर तुम्हाला आता सिलेंडर मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकांनो सावधान, ज्या मोबाईल क्रमांकावरुन बुकिंग केली आहे, त्यावर ओटीपी घरच्यांना देखील माहिती असणे गरजेचा आहे. अन्यथा तुमची तारांबळ उडल्याशिवाय राहणार नाही.
आजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरसाठी जशी बुकिंग करत होता, यापुढेही त्याच पद्धतीने फोनवरूनच बुकिंग करावे. मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. मात्र असे असले तरी या नव्या नियमाने ग्राहकांची चांगलीच अडचण होईल व सिलेंडरसाठी वितरकांसोवत खटके उडू शकतील.

Related Articles

Back to top button