राजकीय

शरद पवारांची नवी खेळी

  • गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला धक्यावर धक्के देत आहेत. अशातच आता पवारांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात एका बड्या नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले महाजन यांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. खोडपे हे महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याची माहिती आहे.
    खोडपे म्हणाले, महाजन यांच्या विरोधात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी शरद पवार गटाकडून उभे राहण्याची तयारी करत आहे. गेल्या 35 वर्षापासून आपण भाजपचे काम करत आहोत. गेल्या १० वर्षापासून भाजपमध्ये आपली घुसमट होत असल्यामुळे आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत.

Related Articles

Back to top button