- केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत 70 वर्षांवरील वृद्धांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कव्हरेज मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
- सरकारच्या या निर्णयामुळे 4.5 कोटी कुटुंबांना आणि 6 कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिक प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकतील अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतील.
ब्रेकिंग! केंद्र सरकारचा मोठा निर्णय
