सोलापूर

स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल अपशब्द

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा समाजकंटक ज्ञानेश महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची अक्कलकोटचे भावी आमदार रमेशअण्णा सिद्रामप्पा पाटील (भाजप नेते )यांनी केली आहे. अनेकांचे श्रद्धास्थान असलेले अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातील अनेक भाविक अक्कलकोटला येत असतात.

श्रीस्वामींचे पुण्यतिथी प्रकट दिन असो असेच दर गुरुवारी महाराष्ट्र राज्यासह देशभरातून बहुसंख्य श्री स्वामी भक्त दर्शनासाठी अक्कलकोट येत असतात. श्रीस्वामी समर्थांचे पुण्यतिथी असो अथवा जयंती असो सर्वच उत्सव सर्व धर्मीय लोक गुणगोविंदात साजरा करतात अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी नेहमी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद अनेक भक्त भाविकांच्या पाठीशी असल्याने समाजात शांतता सुव्यवस्था नांदत आहे. सर्व सण उत्सव आनंदात साजरे केले जातात. 
श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादांचा अनुभव प्रत्येकास अनुवास मिळतो आहे.
याच श्री स्वामी समर्थाबद्दल समाजात शांतता व सुव्यवस्था याला बाधा आणत समाजकंटक ज्ञानेश महाराज याने अतिशय नीच पातळीवर जाऊन अपमानकारक वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्यासमोर एका कार्यक्रमात असे वक्तव्य केल्याने समाजात त तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या समाजकंटक ज्ञानेश्वर महाराज यांच्या विषयी भक्त जणांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.या ज्ञानेश महाराज यांच्या अवमानकारक वक्तव्यानंतर भक्तगणांची मने दुखावले असून या महाराजांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी अक्कलकोटचे भावी आमदार रमेशअण्णा सिद्रामप्पा पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या निवेदनानंतर पोलीस अधीक्षकांनी ज्ञानेश महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. हे निवेदन देतेवेळी श्रीशैल हुळळे, उमाकांत शटगार ,बसवराज आहेरवाडी ,संगप्पा बबलाद ,योगेंद्र मोगे, महादेव बिराजदार आधी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button