ब्रेकिंग! फडणवीस यांनी उडवून दिली खळबळ
काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती नैसर्गिक नसल्याची टीका करणाऱ्या भाजपची गोची करणारे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी महायुतीबद्दल टिप्पणी केली आहे. अजितदादा पवार यांच्यासोबत असलेली आमची युती नैसर्गिक नाही. अजितदादांना आमचा गुण लागण्यासाठी वेळ लागेल, असे त्यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी हे विधान केले आहे. अजितदादा यांनी अलीकडेच आपल्या राजकीय भूमिकेविषयी वक्तव्य केले होते. महायुतीत असलो तरी धर्मनिरपेक्षतेशी तडजोड करणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या दारुण पराभवानंतर अजितदादा यांच्याशी झालेल्या युतीकडे बोट दाखवले गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपल्या मुखपत्रातून नाराजी व्यक्त केली होती. ती चूक होती का, असे फडणवीसांना विचारले असता त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. ती त्या वेळेची गरज होती. आलेली संधी कधी सोडायची नसते. सगळं काही स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ लागेल. त्यांना आमचा गुण लागेल. परिणामी दोघांचाही फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले.