महाराष्ट्र

दादांचा वादा अन् अनाथांचा नाथ

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या श्रेयावरुन अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत काल शिंदे गटाच्या नेत्यांनी गदारोळ घालत राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेवर आक्षेप घेतला. राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत ‘अजितदादांची लाडकी बहिण योजना’  असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला. यावरुन शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली. या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चांगलीच चपराक दिली आहे. अर्थसंकल्पादरम्यान, ‘अनाथांचा नाथ एकनाथ’ अशी बॅनरबाजी करण्यात आली. त्यावेळी आम्ही विरोध केला नसल्याची आठवण उमेश पाटलांनी करुन दिली आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांचे नाव वगळून ही योजना आम्ही आणली, असे सांगितले जात आहे, असा आक्षेप नोंदवून अजितदादा एकटेच कसे या योजनेचे श्रेय घेऊ शकतात, असा सवाल शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात केला.

Related Articles

Back to top button