राजकीय

ब्रेकिंग! भाजपमध्ये राजकीय भूकंप

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई होणार आहे. दरम्यान, भाजपाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 

भाजपाच्या पहिल्या यादीत 67 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीनुसार मुख्यमंत्री नायब सिंह सैनी लाडवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपाने अंबाला कँटमधून अनिल विज यांना उमेदवारी दिली आहे. तर कॅप्टन अभिमन्यू यांना नारनौलमधून तिकीट मिळाले. मात्र, या यादीनंतर भाजपामध्ये भूकंप आला असून राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. भाजप किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांपासून पक्षाच्या उपाध्यक्षांपर्यंत अनेक माजी आमदारांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
राजीनामा दिलेल्या नेत्यांपैकी अनेक जण काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी आमदार सुखविंदर सिंह श्योराण यांचा समावेश आहे. त्यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. फेसबुकवर अलविदा भाजप असे लिहून त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. 
बाढहा मतदारसंघातून लढण्यास ते इच्छुक होते, मात्र भाजपने येथून उमेद पातूवास यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या श्योराण यांनी राजीनामा दिला आहे. श्योराण यांच्या प्रमाणेच उकलाना येथील भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीमा गैबीपूर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच भाजप किसान मोर्चा चरखी दादरीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ भल्ले चेअरमन यांनीही राजीनामा दिला आहे.

Related Articles

Back to top button