बिजनेस

सॅमसंगची कमाल ; लाँच केला स्वस्तात मस्त फोन

सोलापूरसह अन्य भागात सॅमसंग कंपनीच्या मोबाईल हँडसेटला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. दरम्यान सॅमसंग कंपनीने एक नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. या फोनला Samsung Galaxy A06 असे नाव देण्यात आले आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. 

या हँडसेटमध्ये अनेक चांगले फिचर्स देण्यात आली आहे. यामध्ये 50MP कॅमेरा आणि 500mAh बॅटरी आहे. या हँडसेटची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये 64GB स्टोरेज उपलब्ध आहे. याशिवाय, त्याचा 4GB + 128 GB व्हेरिएंट 11,499 रुपयांना उपलब्ध असणार आहे. सॅमसंग A सीरीजचा हा फोन सॅमसंग इंडिया ई-स्टोअरवर उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत ते ई-कॉमर्स स्टोअर्सवरही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
यामध्ये 6.7 इंचाचा IPS LCD पॅनेल आहे, जो HD+ रिझोल्यूशनसह येतो. यामध्ये यूजर्सना 60 HZ चा रिफ्रेश रेट मिळतो. या हँडसेटमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आणि Mali-G52 MP2 GPU वापरण्यात आला आहे. फोनमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP ड्युएल कॅमेरा आहे. हा सॅमसंग फोन 8 MP सेल्फी कॅमेरासह येत आहे.

Related Articles

Back to top button