सोलापूर

ब्रेकिंग! सोलापुरात राजकीय भूकंप

  1. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई होणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात महायुतीला धक्का बसला आहे. येथील शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातील दोन नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. अजितदादा गटाच्या दोन स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे आणि अजितदादा गटाला हा तगडा झटका मानला जात आहे.
    अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अजितदादा गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. 

    मात्र, या विधानसभेच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आपले सुपुत्र रणजीत शिंदे यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. अशात त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या दोन नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे.
    पाटलांच्या उपस्थितीत टेभुर्णीच्या सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला. शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख डी. एस.सावंत यांनी देखील शिंदे गटाला रामराम केला आहे. आमदार शहाजीबापू पाटलांच्या चुकीच्या कार्य पद्धतीमुळे पक्ष सोडला असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button